Home धर्म-समाज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विजय : पाचोर्‍यात भाजपाचा जल्लोष

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विजय : पाचोर्‍यात भाजपाचा जल्लोष

0
38


पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशाच्या १५ व्या राष्ट्रपतीपदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची बहुमताने विजयी झाल्याने पाचोरा येथे भारतीय जनता पार्टीतर्फे विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अटल भाजपा कार्यालय येथे एकत्र येऊन पेढे भरवुन फटाके वाजवत व घोषणा देत परिसर दणाणून सोडला. हा विजय संपूर्ण देशात जनतेचा विजय असुन एका सामान्य कुटुंबातील व देशातील सर्वात दुर्लक्षित आदिवासी समुदायातून व विशेषता एक महिला जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदी पदावर विराजमान होत आहेत. याचा आम्हाला विशेष अभिमान आहे, असे यावेळी अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व शहर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound