रस्त्यावर रमत-गमत, खाता-पिता मिळाला फिटनेसचा फंडा!

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरवासियांचे मनोरंजन व्हावे आणि आरोग्याच्या दृष्टीने पहाटे उठण्याची सवय लागावी यासाठी जीतो लेडीज विंग आणि युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे रविवारी काव्यरत्नावली चौकात ‘हॅप्पी स्ट्रीट’चे आयोजन करण्यात आले होते.

जीतो लेडीज विंग आणि युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे रविवारी सकाळी ६.३० ते ९.३० दरम्यान काव्यरत्नवली चौकात हॅप्पी स्ट्रीट (आनंदी रस्ता)चे आयोजन करण्यात आले होते. जळगावात प्रथमच अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी योगा सत्राने हॅप्पी स्ट्रीटची सुरुवात झाल्यावर झुम्बा डान्सने रंगत वाढवली. विविध प्रकारच्या खेळांचा आनंद लुटल्यावर पौष्टिक खाद्यपदार्थाच्या मेजवानीचा सर्वांनी आनंद घेतला. रविवार असून देखील तब्बल २ हजारावर जळगावकरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. उपक्रमासाठी जैन उद्योग समूहाचे अशोक जैन, प्रमोद कोगटा, महेंद्र रायसोनी, जैन स्पोर्ट्स अकॅडमी, लखीचंद जैन, जितेंद्र कोठारी, विक्रम मुनोत, एवंत bagrecha,प्रदीप जैन, संतोष अग्रवाल यांचे सहकार्य लाभले. स्वाती जैन यांनी योगा शिकवला तर सागर व लोकेश यांनी झुंबा डान्सचे प्रशिक्षण दिले. नृत्य प्रशिक्षण विकास जोशी यांनी दिले. साधनाश्रमच्या मुलांनी देखील नृत्य सादर केले तसेच पोलीस क्लबच्या विद्यार्थ्यांनी तायक्वांदो व स्केटिंग प्रात्यक्षिक सादर केले. प्रसंगी लाफिंग क्लब, पिंकेस्थान ग्रुप, रनर्स ग्रुपची उपस्थिती होती. प्रसंगी सर्वांची फ्री बोन डेन्सिटी व कॅल्शिअम तपासणी देखील करण्यात आली.

कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जैन उद्योग समूहाचे अशोक जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, जीतो लेडीज विंगच्या अध्यक्षा निता जैन, सचिव सुलेखा लुंकड, युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया, जितो सदस्य,तसेच  ज्योती जैन, रम्या राजकुमार, प्रीती अग्रवाल आदी उपस्थित होते. उपक्रमासाठी संध्या कांकरिया, शीतल जैन, डॉ.सोनाली जैन, प्रणिता चोरडिया, स्वाती जैन,मोना जैन, डॉ. डिम्पल पिपरिया, प्राची जैन, साधना गांधी, कविता भंडारी, वर्षा चोरडिया, दीपा राका, गरिमा राका, खुशबू टाटीया, सारिका संघवी, प्रीती जैन, नितीन चोपडा, अरविंद देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content