रस्त्यावर थुंकणाराला रुमालाने सफाईची शिक्षा !

 

जळगाव,  प्रतिनिधी । कोरोना उपायांचे नियम पाळले  जावेत म्हणून महापालिकेच्या पथकाने आज रस्त्यावर थुंकणाऱ्या तरुणाला त्याच्याच रुमालाने रस्ता सफाईची जागेवर शिक्षा केली !  अशा या ४ पथकानीं  बाजारपेठेत नियमांचे उल्लंघन करणारे दुकानदार आणि अन्य लोकांकडून  ५० हजार रुपयांची दंड  वसुलीही केली .  

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना शहरात विविध ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्क न वापरणे यासारखे प्रकार घडत आहेत.  याला निर्बंध लागावा यासाठी महापालिकेतर्फे प्रभाग निहाय पथक नियुक्त करण्यात आले असून या पथकांनी शहरातील विविध ठिकाणी तसेच रहिवासी परिसरातील नियम मोडणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत ५० हजारांचा दंड वसूल केला आहे. 

प्रभाग समिती क्रमांक १ मध्ये पथक प्रमुख शकील शेख व प्रसाद पुराणिक हे असून सहाय्यक पथक प्रमुख म्हणून संजय अत्तरदे, रमेश कांबळे व पथकातील कर्मचारी विलास ढाके संजय खडके हे आहेत.  तसेच प्रभाग समिती क्रमांक २ साठी जयंत शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली एस. बी. बडगुजर नागेश्वर लोखंडे,  सुहास कोल्हे. अविनाश पाटील हे काम पाहत आहेत.  प्रभाग समिती क्रमांक ३ मध्ये पथक प्रमुख म्हणून समीर बोरवले असून  लोमेश धांडे, सुरेश भालेराव व पथकातील कर्मचारी हेमराज कोल्हे, रवींद्र मुळे हे आहेत.  प्रभाग समिती क्रमांक ४ मध्ये अतुल पाटील यांच्या नेतृत्वात यु. आर.  इंगळे,  चेतन हातागडे यांच्यासह कर्मचारी संदीप अत्तरदे  व दत्तू पाटील हे काम पाहत आहेत. 

दरम्यान, या चारही पथकांनी दिवसभरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेले उपाययोजना जसे मास्क न वापरणे,  सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या अशा  ५५ ते ६० दुकानांवर प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारणी करून एकूण ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पथक प्रमुख अतुल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक सायंकाळी कारवाई आटोपून कार्यालयाकडे येत असतांना त्यांना एक युवक नाथ प्लाझा समोर रस्त्यावर थुंकताना आढळून आला. या युवकास अतुल पाटील यांनी दंड भर नाहीतर थुंकलेले पुसून टाक असे सांगितले असता त्या युवकाने दंड न भरता रस्त्यावर थुंकलेले आपल्या रुमालाने पुसून टाकले.

Protected Content