बापरे ! जिल्ह्यात आज ९९२ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; जळगावात तब्बल ४३० रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात ९९२ रूग्ण आढळून आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून हा आकडा हजाराच्या उबरठ्यावर असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आज जळगाव कोरोनाने कहरच केला असून ४३० रूग्ण एका दिवसात आढळले. त्यामुळे तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लागून करूनही कोरोना आटोक्यात येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

आजची आकडेवारी खालीलप्रमाणे

जळगाव शहर-४३०, जळगाव ग्रामीण-५४, भुसावळ-७३, अमळनेर-१५, चोपडा-९७, पाचोरा-२१, भडगाव-८, धरणगाव-४०, यावल-३२, एरंडोल-२५, जामनेर-५, रावेर-२५, पारोळा-१५, चोळीसगाव-९४, मुक्ताईनगर-२०, बोदवड-२६ आणि इतर जिल्ह्यातील १२ असे एकुण ९९२ रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आजवर एकुण ७१ हजार ६१९ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ६२ हजार ३१८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत तर ७ हजार ८५२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आजच्या अहवालात जळगाव शहर आणि चोपडा तालुक्यातील प्रत्येकी दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर धरणगाव तालुकयातील एका रूग्णाचा मृत्यू झालाय. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ एन.एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 

 

Protected Content