जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर ते दूध फेडरेशनचा रस्ता दुरूस्ती करण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी महापौर जयश्री महाजन यांना घेराव घालत रस्ते दुरूस्ती करण्याची मागणी केली आहे.
गेल्या ३ ते ४ वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज नगरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यावेळी स्थानिक नागरीक व विविध संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा निवेदन व मागणी करूनही महापालिकेचे साफ दुर्लक्ष होत आहे. यापुर्वी दोन दिवसांपुर्वीच छत्रपती शिवाजी महाराज नगरातील क्रांती चौकात देखील स्थानिक नागरीकांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी प्राधान्याने याच परिसरातील रस्ते दुरूस्तीचे आश्वासन महापौर जयश्री महाजन यांनी दिले होते. परंतू अद्यापपर्यंत रस्त्यांच्या कामांना सुरूवात झालेली नाही. मंगळवारी १९ जुलै रोजी सकाळी ११ वाता इंद्रप्रस्थ नगरातील मुख्य चौकात जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नगर ते दूध फेडरेशन रस्ता खराब झाल असून वाहनाधाकरकांना वाहने चालविणे म्हणजे तारेवरची कसरत होत आहे. महापौर जयश्री महाजन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली असता नागरीक व आंदोलनकर्त्यांनी घेराव घातला.
भाग १
भाग २
भाग 3