तंबाखू व पानमसाल्याची विक्री करणाऱ्या तरूणावर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापूरा भागात बेकायदेशीर तंबाखू आणि पानमसाला विक्री करणाऱ्या तरूणावर एमआयडीसी पोलीसांनी छापा टाकून १० हजार ९७० रूपये किंमतीचा मुद्देमाला हस्तगत केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी १५ डिसेंबर रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील तांबापूरा भागात एक तरूण बेकायदेशीरित्या तंबाखू आणि पानमसालाची विक्री करत असल्याची गोपनिय माहिती एमआयाडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पोलीसांच्या पथकाने मंगळवारी १५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता छापा टाकला. यात संशयित आरोपी राज नुरमोहम्मद तडवी (वय-२५) रा. मदीना चौका, तांबापूरा, जळगाव याला ताब्यात घेतले. त्यांच्या जवळ असलेल्या १० हजार ९७० रूपये किंमतीचे तंबाखू आणि पानमसाला हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सुधीर साळवे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राज नुरमोहम्मद तडवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि रविंद्र गिरासे करीत आहे.

 

Protected Content