पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा येथील रंगारी मित्र मंडळातर्फे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून श्री साईबाबा पालखीचे आयोजन केले जाते.
याच अनुषंगाने श्री. साईबाबा यांच्या पालखीची मिरवणूक रंगारी गल्ली, विठ्ठल मंदिर रोड, जामनेर रोड, गांधी चौक, रथ गल्ली, आठवडे बाजार परिसर येथून मोठ्या भक्तिभावाने काढण्यात आली.
या पालखी मिरवणूकीचे ठिकठिकाणी भक्तीभावाने स्वागत व पुजन करण्यात आले. या पालखीचे पूजन पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दिकर, एम. एस. पी. बिल्डकाॅनचे संचालक मनोज शांताराम पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे माजी नगरसेवक वाल्मीक पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजन करून करण्यात आले.
याप्रसंगी राजेश पाटील, स्वप्निल पाटील, संदीपराजे पाटील, राहुल पाटील तसेच रंगार गल्ली कोंडवाडा गल्ली देशपांडे वाडा गांधी चौक रथ गल्ली आठवडे बाजार परिसरातील सर्व मित्रमंडळी उपस्थित होते.
यावेळी किशोर पाटील यांनी श्री. साई भक्तांना शुभेच्छा दिल्या. या पालखी मिरवणूकीचे नियोजन योगेश पाटील, जितू पाटील, राकेश पाटील, अमोल पाटील यांचेसह रंगारी गल्ली परिसरातील असंख्य तरुणांनी केले.