युवा पिढी भारताच्या उज्वल इतिहासाशी जोडली जावी – कर्नल प्रवीण धीमन

 

फैजपूर : प्रतिनिधी । पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाला बळी न पडत युवा पिढी भारताच्या उज्वल इतिहासाशी जोडली जावी  असे प्रतिपादन आज जळगावच्या 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे समादेशक   कर्नल प्रवीण धीमन यांनी केले

 

देशाचा ज्वाजल्य इतिहास अवघ्या जगाला आदर्शवत असताना पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाला तरुण बळी पडत आहे.  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रत्येक भारतीयाने उज्वल इतिहास आठवावा आणि देशाच्या विकासात मोलाची भर टाकावी असे आवाहन कर्नल प्रवीण धीमन यांनी केले. ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात स्वातंत्र्य दिवसाच्या औचित्याने आयोजित ध्वजारोहन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

 

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे.  त्यानिमित्त कर्नल प्रवीण धीमन यांच्या नेतृत्वाखाली 150 किलोमीटर सायकलिंग रॅली काढण्यात आली.

 

रॅलीची सुरुवात काव्यरत्नावली चौक, जळगाव येथून झाली तर समाप्ती गांधीतीर्थ, जळगाव येथे होणार आहे. यात मुळजी जेठा महाविद्यालय  येथील 10 कडेटसनी सुद्धा सहभाग घेतला.

 

दरम्यान महाविद्यालयाच्या ध्वजारोहन सोहळ्याप्रसंगी फैजपूरच्या ऐतिहासिक भूमीत राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशनाच्या स्मृती ताज्या करण्यात आल्या.  यावेळी कर्नल प्रवीण धीमन यांनी ‘कनेक्टिंग युथ विथ हिस्ट्री’  या थीम अनुसार भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मैलाचा दगड ठरलेल्या फैजपूर येथील पहिल्या राष्ट्रीय काँग्रेस ग्रामीण अधिवेशनाच्या चित्र प्रदर्शनाला भेट दिली.

 

यावेळी ध्वजारोहण धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  पी.  आर .  चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले . लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माणशास्त्र  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  व्ही . आर.  पाटील, औषधनिर्माणशास्त्र  पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आर . एल . चौधरी, शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ पिंगला धांडे, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्र सेना कडेट्स उपस्थित होते.

 

प्राचार्य डॉ.  पी . आर .  चौधरी यांनी स्वातंत्र्यंलढ्यात फैजपूरच्या पावन भूमीचे स्मरण ठेवून देशाची प्रभुता आणि अखंडितता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी सहयोग द्यावा. आमदार शिरीष चौधरी हे धनाजी नाना चौधरी, कै मधुकरराव चौधरी यांचा समर्थ वारसा पुढे यशस्वीपणे चालवत आहेत. कोरोना काळ आपल्या साऱ्यांसाठी परीक्षेचा काळ होता मात्र सर्वांच्या सहयोगाने आपल्या या महामारीवर मात करीत आहोत. महाविद्यालयातील तरुणांनी या भूमीचा ऐतिहासिक वारसा समजून घ्यावा असे आवाहन केले.

 

यावेळी केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्या निर्देशानुसार कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर मास्क,  सॅनिटायझर व सोशियल डिस्टन्ससिंगचे पुरेपूर पालन करण्यात आले.  यावेळी एनसीसी कॅडेटसच्या वतीने मान्यवरांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभेदार मेजर कोमलसिंग, सुभेदार जयपालसिंग, हवालदार जसविंदर, राष्ट्रीय सण उत्सव समितीचे प्रमुख डॉ.  आय.  पी.  ठाकूर, एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ.  राजेंद्र राजपूत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.  डी.  एल . सूर्यवंशी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा . शेरसिंग पाडवी, डॉ.  सरला तडवी, नितीन सपकाळे, संतोष तायडे, विलास चौधरी, डी . एस . चव्हाण , गुलाब वाघोदे, नारायण जोगी,  राजेंद्र ठाकूर, सिद्धार्थ तायडे, शेखर महाजन,  चेतन इंगळे,  सुधीर पाटील, मंदार बामनोदकर  आदींनी परिश्रम घेतले.

 

Protected Content