यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पडसाडे बुद्रुक येथील लोकनियुक्त सरपंच मीना राजू तडवी यांना यांना ग्रामपंचायत सदस्य शब्बीर कान्हा तडवी यांचे तक्रारीवरून जिल्हाधिकारी यांनी १२ सप्टेंबर रोजीच्या आदेशानुसार अतिक्रमणाचे कारणावरून अपात्र घोषित केले होते.
या आदेशास अप्पर आयुक्त निलेश सागर यांनी २७ सप्टेंबर पर्यंत स्थगिती दिली आहे. यावल तालुक्यातील फरसाळे बुद्रुक येथील सरपंचा मीना राजू तडवी यांना जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमणाची कारणावरून १२ सप्टेंबर रोजीच्या आदेशान्वये अपात्र केले होते. या आदिशाविरुद्ध सरपंच मीना तडवी यांनी अप्पर आयुक्त नाशिक यांचे कडे बुधवारी १८ सप्टेंबर रोजी अपील व स्थगिती अर्ज दाखल केले असता अप्पर आयुक्त निलेश सागर यांनी २७ सप्टेंबर रोजी अर्जावर सुनावणी ठेवली असून तो पर्यंत जिल्हाधिकारी यांचे आदेशास स्थगिती दिली असल्याची माहीती सरपंच मिना राजु तडवी यांनी दिली आहे.