Home Cities जळगाव युवासेनेतर्फे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्य वाटप

युवासेनेतर्फे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्य वाटप

0
34


जळगाव, प्रतिनिधी । येथील युवासेनेतर्फे मुख्यमंत्री तथा शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील स्मशानभूमीत कार्यरत कर्मचाऱ्यांना किराणा साहित्यासह अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क मंत्री संजय सावंत, समाधान पाटील, जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस हा मदत दिवस साजरा करण्यात आला. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीत सेवा देणारे ११ कर्मचाऱ्यांना किराणा व अन्नधान्य वाटप करण्यात आले. यासाठी राज्य युवा सेना विस्तारक कुणाल दराडे व किशोर भोसले यांच्या पुढाकाराने उपक्रम आयोजित झाला. यावेळी युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी पियुष गांधी, महानगर युवा अधिकारी विशाल वाणी, महेश ठाकूर, यशश्री वाघ, जय मेहता, रोहित शिरसाठ उपस्थित होते.


Protected Content

Play sound