जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भोईटे नगर मध्ये राहणाऱ्या एका रेल्वे कर्मचाऱ्याला युट्युब सबस्क्रीप्शनच्या नावाखाली तब्बल २ लाख ९४ हजार ५०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवार १६ मे रोजी रात्री १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनोजकुमार सूनहरीलाल राज (वय-४५, रा, भोईटे नगर, जळगाव) हे व्यक्ती रेल्वे विभागात नोकरीला आहे. ८ मे रोजी त्यांना एका अनोळखी नंबरवरून व्हाट्सअप वरती मेसेज आला. त्यामध्ये युट्युब लिंकवर सबस्क्रीप्शन केल्यास आपल्याला प्रत्येकी ५० व दीडशे रुपये मिळतील, अशी बतावणी केली. त्यानंतर मनोज कुमार यांनी लिंकला सबस्क्रीप्शन केले. त्यानंतर समोरील व्यक्तीने टेलिग्रामचा आयडीवर ग्रुप जॉईन करून घेतला, त्या ग्रुपमध्ये सुरुवातीला ८ मे ते ११ मे दरम्यान केलेले सबस्क्रीप्शनचे एकूण ४ हजार ३५० रुपये दिले. त्यानंतर मनोजकुमार यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे बँकेचा अकाउंटनंबर देऊन सांगितल्याप्रमाणे पैसे पाठवले. दरम्यान आतापर्यंत वेगवेगळ्या कारण दाखवत मनोजकुमार यांच्याकडून सुमारे २ लाख ९४ हजार ५०० रुपये रकमेची ऑनलाईन फसवणूक केली. दरम्यान आपले फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनोजकुमार राज यांनी मंगळवारी १६ मे रोजी रात्री ११ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्त विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड करीत आहे.