यावल प्रतिनिधी | तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सदस्य निवडीसाठी ४ जागासाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी असे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या १८ प्रभागातील २५ सदस्य निवडीसाठी २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या वैध १३ उमेदवारी अर्जांपैकी गुरुवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी दोन, उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने ४ उमेदवार निवडीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत, पैकी पाडळसे , कासवे, व न्हावी प्र. यावल येथील प्रत्येकी एक असे तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
तालुक्यातील म्हैसवाडी, पिळोदे, बुद्रुक, पाडळसे, कासवे, न्हावी प्र अडावद, शिरागड, गिरडगाव, दहिगाव, गाड-या, न्हावी प्र यावल, बोरावल बु, अशा ११ ग्रामपंचायतीच्या १८ प्रभातील २५ सदस्य निवडीसाठी २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणूक करिता केवळ १६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते त्यातील तीन उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये अवैध ठरल्याने व गुरुवारी माघारीच्या अंतिम दिवशी दोन उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने ११ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले.
त्यातील न्हावी प्रभाग १ मध्ये १ उमेदवार ,पाडळसा ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ४ मधून १ आणी कासवे ग्रुप ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक २ मधील १ उमेदवार अशा ३ उमेदवार यांच्याविरोधात एकही अर्ज नसल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. पिळोदा बुद्रुक येथे अनु. जाती प्रवर्गातील १ सदस्य निवडीसाठी न्हावी प्र यावल येथे सर्वसाधारण स्त्री , प्रवर्गातील एका जागेसाठी व सर्वसाधारण प्रवर्गाच्या दोन जागेसाठी अशा न्हावी येथे दोन प्रभावी तीन जागेसाठी निवडणूक होत आहे.
११ ग्रामपंचायतीच्या १८ प्रभागांपैकी तीन प्रभागातील ४ उमेदवार निवडीसाठी ही निवडणूक होत असून दहीगाव १७ सतरा जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज नसल्याने त्या जागा रिक्तच राहणार आहेत .