यावल, प्रतिनिधी| येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा यावल नगर परिषदचे नगरसेवक प्रा. मुकेश येवले यांनी काल दि. ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता ‘झूम’ या वेबिनार मिटींग आयोजीत केली. त्याला तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी चांगला प्रतिसाद दिला.
सध्या आपल्या देशात आणि राज्यात मागील ८० दिवसापासुन अधिक काळापासुन कोरोना या संसर्गजन्य महामारी आजाराच्या पार्श्वभुमीवर प्रा. मुकेश येवले यांनी तालुक्यातील या आपत्कालीन परिस्थितीत उद्धभवलेल्या समस्यांचे चिंतन करून त्यावर मार्गदर्शन व उपाययोजनांचे स्वरूप याबाबत थेट संपर्क साधण्यासाठी ‘झूम’ या वेबिनार संपर्क माध्यमाचा उपयोग केला. या बैठकीत त्यांनी कोरोना सारख्या गंभीर महामारीच्या प्रश्नापासून विविध तालुक्यातील समस्यांवर पक्षातील पदाधिकाऱ्यांशी साविस्तर चर्चा केली. लॉकडाऊनच्या काळात व्हीडीओ कॉन्सफरन्सचा प्रयोग प्रथमच घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील व जिल्हा पातळीवरील पहिला राजकीय प्रयोग थेट कार्यकर्त्यांशी सम्पर्क साधण्याचा हा प्रयोग यशस्वीपणे पार पडला. आज २ ते ३ महिन्यांनंतर कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद करता आला यात प्रा. येवले यांनी ही आपला सहभाग नोंदवला. सध्याच्या सोशल मीडियाचे नवयुग निर्माण झाले असुन या बदलत्या युगात आपणही मागे नाही याचा अनुभव आला. याद्वारे आपले निमित्ताने आपण केलेल्या प्रश्नाना पक्षाच्या पातळीवर सोडविण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्नशील राहुन प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी व्यक्त केलेत. या व्हीडीओ कॉन्सफरन्सव्दारे केलेला प्रयोग खरंच कौतुकास्पद असल्याचे सांगीतले.