यावल येथे शिवसैनिकांची बैठक उत्साहात 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील शिवसेना मध्यावर्ती कार्यालयात नुकतीच रावेर विधानसभा मतदारसंघाची बैठक अनेक शिवसैनिकांच्या उपस्थित संपन्न झाली.

रावेर यावल विधानसभा मतदारसंघात शिवसेने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची भक्कम फळी निर्माण करण्याच्या उद्देशाने रावेर यावल विधानसभा संपर्क प्रमुख मोहन मसुरकर व चोपडा विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली या बैठकीत रावेर विधानसभा कार्यक्षेत्रात शिवसेनेची भक्कम फळी निर्माण करणेबाबत मार्गदर्शन व काही महत्त्वाच्या सूचना दिल्या तसेच रावेर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना सदस्य नोंदणी फॉर्म बाबत माहिती देऊन यावल सह तालुक्यातील उपस्थित शिवसैनिकाचे फॉर्म भरून घेतले. शिवसेना सदस्य नोंदणी हि यावल तालुक्यातील प्रत्येक गावा गावात जाऊन सर्व शिवसैनिकाचे सदस्य नोदणी फॉर्म भरण्यात येणार असल्याची माहीती देण्यात आली . या बैठकीत यावल शहरातील नागरीकांनी संपर्कप्रमुख मोहन मसुरकर व संपर्क प्रमुख गडकरी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, शिवसेना उपजिल्हा संघटक दिपक बेहेडे, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख रावेर योगीराज पाटील, शिवसेना यावल तालुका संघटक गोपाल चौधरी , शिवसेना यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, शिवसेना तालुका उपप्रमुख शरद कोळी, शिवसेना तालुका उपप्रमुख विलास चौधरी, शिवसेना तालुका उपप्रमुख राजेंद्र काठोके, माजी तालुका प्रमुख विजयसिंह पाटील , माजी तालुका प्रमुख कडू पाटील, आदिवासी सेल तालुका प्रमुख हुसेन तडवी, अल्प संख्यांक तालुका संघटक अजहर खाटीक , युवासेनाचे तालुका सरचिटणीस सचिन कोळी, युवा सेना शहर अधिकारी सागर देवांग, शिवसेना तालुका प्रसिद्धीप्रमुख संतोष वाघ, कृषी उत्पन्न समिती माजी सभापती भानुदास चोपडे, चितोडा ज्येष्ठ शिवसैनिक वामनदादा नेहते, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण साळुंखे (चिंचोली), शिवसेना शहर संघटक सुनील बारी , शिवसेना उपतालुका संघटक सुनील जोशी , शिवसेना उपतालुका संघटक योगेश चौधरी, उपतालुका संघटक संदीप माळी, शिवसेना उप शहरप्रमुख संतोष खर्चे, शिवसेना उपशहर प्रमुख योगेश राजपूत, शिवसेना उपशहर प्रमुख निलेश पाराशर, शिवसेना उपशहर प्रमुख शकील पटेल, विभाग प्रमुख सुधाकर धनगर, विभाग प्रमुख प्रल्हाद बारी, प्रवीण लोणारी , सारंग बेहडे , उदयसिंग पाटील , मयूर खर्चे , उपविभाग संघटक शहाजी भोसले, श्याम ठाकरे, हमीद पटेल, इमया सुदिन, शेख शफयुद्दीन खाटीक, डॉ.विवेक अडकमोल, विलास तळेले फैजपूर, किशोर कपले फैजपूर, स्वप्निल करंडे विरावली शाखाप्रमुख, संजय मोतीराम पाटील शिवसेना पदाधिकारी शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content