यावल येथे शिवजयंती उत्सावानिमित्त भव्य मिरवणूक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात विविध ठिकाणी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठया उत्साहात पार पडला. येथील शिवरत्न फाउंडेशन व छत्रपती ग्रुप आयोजित उत्सव समितीच्या वतीने सायंकाळी येथील बोरावल गेट पासून शहरातून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शहरातील विविध भागात उत्साहात शिवप्रतिमेचे पूजन करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे येथील बोरावलगेट परिसरात शिवरत्न फाउंडेशन व छत्रपती ग्रुप आयोजित उत्सव समितीच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही उत्सवाचे आयोजन केले होते माजी नगराध्यक्ष अतुल पाटील डॉक्टर कुंदन फेगडे यांचे हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर शिव प्रतिमेची शहरातील प्रमुख मार्गाने रात्री उशिरा पर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

या निमित्ताने शहरातील मुख्य मार्गावरील रस्त्यावर रांगोळ्या,भगवे ध्वज, भगव्या पथकांनी शहर भगवेमय झाले होते. संपुर्ण शहर छत्रपतींच्या जयजयकाराने शहर दुमदुमून गेले होते विविध पक्षांचे राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते शिवप्रेमी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले सुधाकर बावस्कर यांनी सूत्रसंचालन केले. आज सकाळी बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर यांचे वतीने देखील येथील खरेदी विक्री सहकारी संघाच्या संकुलनातील आवारात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर सोनवणे , माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, चंद्रकांत जगन्नाथ पाटील, प्रशांत चौधरी, आदीवासी विभागाचे पदाधिकारी एम बी तडवी, मराठा सेवा संघाचे अजय पाटील, आर डी पाटील माजी नगरसेवक असलम शेख नबी, प्रा. मुकेश येवले, भगतसिंग पाटील या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने येथील शिवाजी नगरात सायंकाळी आमदार शिरीष चौधरी जि प गट नेते प्रभाकर चौधरी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यासह येथील बस स्थानक, धोबीवाडा ,महाजन गल्ली , शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयातही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

Protected Content