यावल येथे शहिदांना अभिवादन

 

 : यावल : प्रतिनिधी  । येथील पंचायत समिती आणि तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज शाहिद दिनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील शहिदांना अभिवादन केले

शहीद क्रांतीकारक भगतसिंग , शिवराम राजगुरू , सुखदेव यांनी  हिन्दुस्थानातील ब्रिटीस साम्राज्याविरुद्धच्या स्वातंत्र्याच्या लढयात  केलेल्या संघर्षामुळे वयाच्या अवघ्या २ ३ व्या वर्षी २३ मार्च १९३१ रॉकी  त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती.

 या क्रांतीकारी शहीदांच्या स्मृतीदिना निमित्त आज यावल पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील , एस एस तायडे , कनिष्ठ प्रशासन अधिकारी रिधे, श्रीमती सुनिता सोनवणे , आर पी देशमुख ,लतेश नेमाडे, आशिक पिंजारी , के एस पाटील , विशाल राऊत , जावेद तडवी , अक्षय शिरसाळे , मोहन हिरळकर , मिलींद कुरकुरे , भुषण मेढे यांनी अभीवादन केले .

 यावल तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय ईमारतीत प्रभारी तहसीलदार आर डी पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार , सुयोग  पाटील , रविंद्र माळी , दिपक भुतेकर, निशा चव्हाण, सुरज जाधव यांच्या उपस्थितीत शहीद दिवस साजरा करण्यात  आला 

 

 

 

Protected Content