यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील विजयादशमीच्या दिवशी बुधवार, दि.५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांचेहस्ते रावण दहन करण्यात येणार आहे.
यावलचे प्रसिद्ध श्री महर्षी व्यास मंदीर, क्षेत्रातील परिसरात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम दयाराम पाटील राहतील; तर प्रमुख पाहुणे म्हणून फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलग, उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे,तहसीलदार महेश पवार, पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर, यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे, खरेदी विक्री संघाचे संचालक आर.जी.पाटील, अमोल हरिभाऊ जावळे यांचेसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास नागरीकांना उपस्थिती राहण्याचे आवाहन रावण दहन कार्यक्रमाचे आयोजक समितीचे अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, अमोल दुसाने, डॉ. हेमंत येवले, विवेक देवरे, प्रभाकर वाणी, अमोल भिरुड, अरुण लोखंडे यांचेसह समितीच्या वतीने करण्यात आले आहे.