यावल, प्रतिनिधी | येथील रहिवासी असलेल्या एका पोलीस पाटलाचा आज कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या वृत्तास प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
पोलीस पाटील यांचा २९ रोजी स्वाॅब चाचणीतील अहवाल पॉझिटीव्ह आला असता कोवीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला आहे. शुक्रवार दि. २९ मे त्यांचा मुलगा त्यांच्या संपर्कात असल्याने त्याला देखील क्वारेंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना बाधीत मृत्युंचा आकडा हा आता तीनवर पोहचला आहे. या घटनेला प्रभारी वैद्यकीय अधिकारी मनीषा महाजन व तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी दुजोरा दिला आहे. यावल तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी बाहेर निघू नये, विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन प्रशासन यांनी केले आहे.