यावल येथे भारत जोडो पदयात्रेला सुरुवात

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत भारत जोडो पदयात्रेला सुरुवात झाली असून या पदयात्रेला यावल येथील सर्वत्र नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

आज दिनांक १२ ऑगस्ट रोजी चौथ्या दिवसी थोरगव्हाण, मनवेल, सकळी, वाडोदे, चिंचोली, नायगाव येथे काँग्रेसचे जेष्ठ माजी आमदार रमेश चौधरी ८२ वर्षाच्या वयात देखील या पदयात्रेत फिरले व तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये व माजी जिल्हा परिषद सदस्य आर. जि. पाटील, (नाना) , विनोद पाटील, सतीश पाटील, सुरेश चौधरी, योगेश पालवे, सचिन तडवी, किशोर पाटील तसेच पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, काँग्रेस कमेटीचे यावल शहराध्यक्ष कदीर खान, बढोदे गावाचे सरपंच संदीप सोनवणे , काँगेस कमेटीचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, विकी गजरे, शेख सकलेन, धीरज सोनवणे, विकी सोनवणे, रोहन महाजन यांच्यासह असंख्य नागरीकांचा या पदयात्रेला प्रतिसाद मिळत आहे .

या काँग्रेस पक्षाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने काढण्यात आलेल्या पदयात्रेला मोठ्या संख्येत ग्रामीण क्षेत्रातील कार्यकर्ता जुडत आहे .९ ऑगस्ट पासुन दहीगाव, सावखेडा सिम, मोहराळा या गाव पासुन सुरू झालेली पदयात्रा सुमारे पन्नास गावातुन यात्रा करीत यात्रेचा समारोप १५ ऑगस्ट रोजी शेवटच्या व अखेरच्या काढण्यात येणाऱ्या पदयात्रेतुन होणार असल्याची माहीती कॉंग्रेस पक्षाच्या सुत्रांकडुन मिळाली आहे .

Protected Content