यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील भाजपा युवा मोर्चाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त युवा मोर्चा तर्फे युवकांच्या वतीने ७५ मोटर बाईक ची रॅली काढण्यात आली.
संपुर्ण शहराचे लक्ष वेधणाऱ्या या रॅलीची फैजपुर मार्गावरील श्री मनुमाता मंदिर येथून सुरुवात करण्यात आली. भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातुन संपूर्ण यावल शहरासह काही ग्रामीण क्षेत्रातुन देखील तिरंगा रॅली मोठया उत्साहाच्या वातावरणात काढण्यात आली.
यावल शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आलेल्या रॅलीत जळगाव जिल्हा सरचिटणीस युवामोर्चा राकेश फेगडे ,अजय भालेराव ( भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,) उमेश फेगडे (भाजप तालुकाअध्यक्ष ), उजैनसिग राजपूत ( भाजपा तालुका सरचिटणीस ), माजी नगरसेवक डॉ कुंदन फेगडे, सागर कोळी ( भाजपा युवामोर्चा तालुका. अध्यक्ष), सागर भारंबे व सर्व पदाधिकारी युवा मोर्चा यावल, भाजपाचे शहरा अध्यक्ष डॉ. निलेश गडे, भुषण नेहेते, कुणाल कोल्हे, व्यंकटेश बारी, अतुल भालेराव, रितेश बारी, शरद तायडे, अजय वारके, तुषार चौधरी, राहुल बारी, किरण सावळे, निलेश पाटील, प्रशांत सरोदे, सतिष नेहेते, नितीन सपकाळे, जयेश चौधरी, स्नेहल फिरके, सतीश कोळी, ईश्वर सपकाळे, रघुनाथ धनगर, पराग सराफ, परेश नाईक, मयूर महाजन, सिद्धांत घारू, विशाल कोळी, शेखर बाविस्कर, प्रथमेश घोडके, संजय फेगडे, कोमल इंगळे, यांच्या सह असंख्य भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते.