यावल येथे जागतिक वन दिन साजरा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे जागतिक वन दिवस साजरा करण्यात आला.यावल येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या परिसरात दिनांक २१ मार्च हा जागतिक वन दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या  निमित्ताने यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख जळगाव  आणि यावल सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाने यावल पुर्व वनक्षेत्र कार्यालयात यावल न्यायालयाचे प्रथमवर्ग न्या. विनोद डामरे यांचे हस्ते प्रमुख उपस्थितीत विविध वृक्षांच्या लागवडीचा कार्यक्रम पार पडला.

यासोबत  परिसरात पक्षींना दाणे खाण्यासाठी ब्रुस्टर भांडे झाडांना लावून ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ, हरभरा व इतर दाळी मिश्रण धान्य टाकण्यात आले आणि प्राण्याना उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी पाण्याची टाकी लावून पिण्याचे पाणी भरून र१ मार्च हा जागतिक वन दिन साजरा करण्यात आला.

 

या कार्यक्रमात यावल पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर  आणि वनपाल अतुल तायडे,रविंद्र तायडे, रज्जाक तडवी,ड.गोविंद बारी, ड. सावकारे आणि वनक्षक भैय्यासाहेब गायकवाड,सतिष वाघमारे, गोवर्धन डोंगरे, क्रिष्णा शेळके , निंबा पाटील,गणेश चौधरी, सुपडू  सपकाळे, तुकाराम लवटे, प्रकाश बारेला, जिवन नागरगोजे, नंदलाल वंजारी , वनमजुर अनिल पाटील, अशोक माळी, पंढरी बारी यांच्यासह वनमजुर आदी मोठया संख्येत उपस्थितीत होते. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर व सर्व वन कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले.

Protected Content