व्यापार्‍याची कारमधील तीन लाखांची बॅग लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील दाणा बाजारात आलेल्या व्यापार्‍याची कारमधून ३ लाख रुपये ठेवलेली बॅग लांबविल्याची घटना घडली असून या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारळाचा माल घेण्यासाठी दाणाबाजारात आलेल्या होलसेल विक्रेता संदीप सिताराम परदेशी (रा.रायपूर, ता.जळगाव) यांना ’तुमच्या चारचाकी वाहनातील हवा कमी होत आहे’ असे सांगून चोरटयाने कारमधील ३ लाख रूपये असलेली बॅग चोरटयाने लांबविल्याची घटना मंगळवारी २१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

संदीप परदेशी हे जळगाव तालुक्यातील रायपूर येथील रहिवासी असून त्यांचे गावात होलसेल किरणामाल विक्रीचा व्यावसाय आहे. आठवडयातून एकदा ते दाणाबाजार येथे माल घेण्यासाठी येत असतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी २१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ते दाणाबाजारात नारळाच्या गोण्या घेण्यासाठी कारमधून आले होते. नारळाच्या गोण्या वाहनात ठेवल्यानंतर ते कार वळवत असताना एकाने त्यांना सांगितले की तुमच्या कारच्या मागील चाकाची हवा ही कमी होत आहे. त्यामुळे परदेशी हे कारच्या खाली उरतले आणि चाक पाहण्यासाठी कारच्या मागे आले. तेवढयात एका चोरटयाने परदेशी यांनी व्यापार्‍यांना पेमेंट देण्यासाठी आणलेली ३ लाख रूपये ठेवलेली बॅग लांबविली.

परदेशी यांनी चाक पाहिल्यानंतर हवा बरोबर आहे म्हणून पुन्हा कारमध्ये बसण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना त्यांची पैशांची बॅग दिसून आली नाही. त्यांनी बाजू-बाजूला तिचा शोध घेतला पण, बॅग मिळून आली नाही. त्यांनी लागलीच शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. यानुसार रात्री उशीरा याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला.

Protected Content