यावल प्रतिनिधी । शहरातील एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोना सदृश्य आजाराने मृत्यू झाला असून तिचे स्वॅब सँपल आधीच घेण्यात आले असून याचा अहवाल नेमका काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत वृत्त असे की, यावल शहरासह ग्रामीण भागात आता कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. यातच पॉझिटीव्ह रूग्णासह संशयितांच्या मृत्यूने नागरिक अस्वस्थ झाले आहेत. यातच आज शहरातील एका ६५ वर्षाच्या महिलेचा कोरोना सदृश्य आजाराने मृत्यू झाला आहे. या महिलेस कोरोनाच्या संसर्गाप्रमाणे व्याधी जडली होती. कालच तिचा स्वॅब सँपल घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, उपचार सुरू असतांना आज तिचा मृत्यू झाला. आता तिचा अहवाल नेमका काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही महिला शहरातील देशमुख वाड्यातील रहिवासी असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.