Home आरोग्य पारोळा येथील वृध्द कोरोना पॉझिटिव्ह; रहिवासाचा परिसर सील

पारोळा येथील वृध्द कोरोना पॉझिटिव्ह; रहिवासाचा परिसर सील

0
39

पारोळा प्रतिनिधी । शहरातील एका ६५ वर्षीय वृध्दाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्याचा रहिवासा असणारा परिसर प्रशासनातर्फे आज सील करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, पारोळा शहरात अनेक दिवसांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता. तथापि, अलीकडेच शहरात कोरोनाचा शिरकाव झाला असून एक जण पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. या पाठोपाठ आता शहरातील महावीर नगर भागातील ६५ वर्षाच्या वृध्दाचा रिपोर्ट देखील पॉझिटीव्ह आला आहे. हा वृध्द मुंबई येथे उपचार घेत असून तेथेच त्याचे सँपल घेण्यात आले होते. दरम्यान, संबंधीत रूग्ण पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महावीर नगरातील भाग सील करण्यात आला असून परिसरात फवारणी करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound