Home आरोग्य यावल येथे एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह

यावल येथे एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह

0
41


यावल प्रतिनिधी । शहरातील बाबूजीपुरा परिसरातील एका संशयित रूग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी दिली असून प्रशासनातर्फे त्याच्या वास्तव्याच्या परिसरात उपाययोजना सुरू केल्या आहेत.

याबाबत वृत्त असे की, गेल्या तीन दिवसांपासून बाबुजीपुरा परिसरात राहणार्‍या सुमारे ४५ वर्षीय व्यक्तीला तीन दिवसांपुर्वी कोरोनाची लक्षणे जाणवू लागले होते. त्यांना उपचारासाठी जळगावातील जिल्हा कोवीड रूग्णालयात दाखल केले होते. त्याच दिवशी स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले. आज कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी बोलतांना सांगितले. खबरदारी म्हणून आरोग्य यंत्रणेने बाबुजीपुरा परीसराला प्रतिबंधित करण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी, नगरपालिकेचे कर्मचारी व आरोग्य कर्मचारी दाखल झाले आहेत.


Protected Content

Play sound