यावल प्रतिनिधी । येथील एसटी बसच्या आगारातून परप्रांतीय मजुरांना घेऊन बस मध्यप्रदेश सीमेच्या चोरवड या नाक्यावर २१ प्रवासी सोडण्यात आले.
लॉक डाऊन मुळे लाखो परप्रांतीय मजूर हे आपापल्या घरी निघाले आहेत. या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने परिवहन मंत्री ना अनिल परब यांनी अशाप्रकारे कामानिमित्त राहत असलेल्या परप्रांतीयांसाठी राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोफत बस सेवा सुरु केली आहे. या अनुषंगाने यावल एसटी आगारातून अशाच प्रकारे भागलपूर उत्तर प्रदेश च्या २१ प्रवाशांना घेऊन मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या चोरवड नाक्यापर्यंत या सर्व कामगार प्रवाशांना सोडण्याचा आले.
याप्रसंगी तहसीलदार जितेंद्र कुवर, नोडल अधिकारी दिनेश कोते, सहाय्यक नोडल अधिकारी आर. एन. पाटील, वैद्यकीय अधिकारी राहुल गजरे, यावल आगाराचे प्रभारी व्यवस्थापक एस व्ही भालेराव, आगार निरीक्षक जी. पी. जंजाळ, वाहतूक नियंत्रक संदीप अडकमोल, कमलाकर चौधरी, एस. यू. मोरे, खतीब तडवी आदींनी उपस्थित राहून या परप्रांतीय मजुरांचा आपल्या मूळगावी जाण्याचा मार्ग सुकर केला.