यावल येथील शिवभोजन थाली वादाच्या भोवर्‍यात

यावल प्रतिनिधी । येथे सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाली या राज्य शासनाच्या योजनेला प्रारंभ झाला असला तरी याचे वाटप करण्यात गैरव्यवहार झाल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.

गेल्या चार दिवसापुर्वी शहरासाठी १०० ताटांचे शिवभोजन केंद्रास यावल तालुक्यातील निवड समीीती सदस्य तहसीलदार जितेंद्र कुवर, मुख्याधिकारी बबन तडवी व गटविकास अधिकारी निलेश पाटील यांच्या त्रीसदस्यीय समीतीने येथील एका बचत गटास मंजुरी दिली असून दोन दिवसापूर्वीच केंद्र सुरू करण्यात आले आहे. मंजुरीच्या दिवसापासूनच मंजुरी दिलेल्या बचत गटास संशयास्पद व अर्थपुर्ण मंजुरी दिल्याचा आरोप प्रकाश भास्कर पारधे , पुंडलीक बाजीराव बारी, रेखा संतोष खर्चे या तीन आक्षेपकर्त्यांनी केला होता. त्यावर सोमवारी येथील तहसील कार्यालयात निवडसमीतीने आक्षेपकर्त्यांचे ऐकून घेतले. दोन दिवसात संबंधीत समीती त्यावर आपले अंतिम निर्णय घेणार असल्याचे तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी सांगीतले.

गेल्या चार दिवसात अनेक दिवसांपासून मोलमजुरी करून हातावर पोट भरणारे नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून जय शिव भोजन थाली घराची वाट बघत असताना तोच भोजन केंद्र वादाच्या भोवर्‍यात सापडले असल्याने शहरवासीयांसाठी मात्र शिव भोजन थाली केंद्र हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. असल्याने शहरात यावर केंद्र निवड करणारी समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Protected Content