यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शुक्रवार ४ मार्च रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत विद्यार्थी विकास विभाग स्वयंसिद्धा अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या सहाय्यक अधिकारी एम .ए. सुलताने प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांनी भूषवले.
विद्यार्थिनींना आत्मसुरक्षेचे धडे देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. गोपाळ जोनवाल व प्रेमलता जोनवाल यांनी या कार्यशाळेत आत्मसुरक्षेविषयी विविध तंत्र शिकविले. तसेच शरीर तंदुरुस्तीसाठी विविध प्रकारचे व्यायाम शिकवले. विद्यार्थिनींनी आत्म सुरक्षेकरिता आत्मसात केलेली विविध प्रात्यक्षिके करून दाखविली. या कार्यशाळेत राधिका बुरुजवाले व सुचिता बडगुजर यांनी उस्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता चौधरी हिने केले तर आभार युवती सभा प्रमुख डॉ. सुधा खराटे यांनी मानले .पन्नास विद्यार्थिनी या कार्यशाळेमध्ये सहभागी झाल्या होत्या. कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थी विकास प्रमुख डॉ. एस .पी. कापडे व उपप्राचार्य प्रा. ए .पी .पाटील यांनी केले . कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा.एम .डी. खैरनार, प्रा. एस. आर. गायकवाड ,डॉ पी .व्ही .पावरा ,श्री एम पी मोरे ,सुभाष कामडी, मिलिंद बोरघडे व प्रमोद भोईटे यांनी सहकार्य केले.