यावल महाविद्यालयात संविधान दिवस साजरा

यावल, प्रतिनिधी | ज. जि. म. वि. प्रसारक संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘भारतीय संविधान दिवस’ साजरा करण्यात आला.

 

संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख वक्ते एम. पी. मोरे होते तर अध्यक्षस्थान कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संजय पाटील यांनी भूषविले. प्रारंभी ‘भारतीय संविधान उद्देशिका’ याचे वाचन करण्यात आले त्यानंतर एम. पी. मोरे यांनी भारतीय संविधान दिवस साजरा करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. संजय पाटील यांनी विचार व्यक्त केले की, संविधानाची श्रेष्ठता, मूल्यात्मता व उदार व्यापकता ही प्रत्येक नागरिकाने समजून घेणे महत्त्वाचे आहे. आज देशातील सर्व सामान्य माणूस केवळ संविधानामुळेच सुखी आहे. प्रा. डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. आर. डी. पवार यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास पाटील, प्रवीण पाटील, सुभाष कामडी यांनी सहकार्य केले.

Protected Content