शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा

औरंगाबाद प्रतिनिधी | माजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी आज सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने छापेमारी केली आहे.

माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. १२ जणांच्या पथकाकडून सकाळी साडेवाठ वाजल्यापासून खोतकर यांच्या घरी ईडीकडून तपासणी करण्यात आली. औरंगाबाद मधील एका उद्योजक आणि व्यावसायिकाच्या घरी  ईडीने केलेल्या छापेमारीचं कनेक्शन खोतकरांशी असल्याची माहिती समोर आली आहे. जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात खोतकरांचा संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या  यांनी केले होते आरोप. त्या पार्श्वभूमीवर ईडीने खोतकर यांच्या घरी छापा मारत तपासणी केली. कालच शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या निकटवर्तीयांच्या घरी ईडीने कारवाई केल्यानंतर आज खोतकर यांच्यावर छापा टाकण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

Protected Content