यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यानी घेतली संविधांनाची शपथ देण्यात आली.
यावल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी कल्याण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. या कार्यकमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व विशद केले. नंतर विद्यार्थ्यांना भारतीय संविधान उद्देशिकेची शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रमात मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना मार्फत घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. यात ७० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, डॉ. एस. पी. कापडे, डॉ. सुधा खराटे, डॉ. पी. व्ही. पावरा, डॉ. आर. डी. पवार, डॉ. अनिल पाटील, डॉ. निर्मला पवार, प्रा. गणेश जाधव, प्रा. सुभाष कामळी, डॉ. संतोष जाधव, प्रा. वैशाली कोष्टी, प्रा. एम. पी. मोरे, मिलिंद बोरघडे, श्री संतोष ठाकूर, प्रमोद भोईटे, दशरथ पाटील, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.