बोलण्यासाठी मोबाईल मागताच दोघांनी लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कॉल करण्याचा बहाणा करून अज्ञात दोन जणांनी विद्यार्थीनीचा महागडा मोबाईल लांबविल्याची घटना शिवकॉलनी येथे शुक्रवारी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह.े

याबाबत अधिक माहिती अशी की, रेवती सुरेंद्र पावरा या नंदूरबार जिल्ह्यातील रहिवासी असून मु.जे. महाविद्यालयात कला शाखेत शिकत आहे. शुक्रवारी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मैत्रिणीला भेटण्यासाठी शिवकॉलनी येथे पायी गेल्या. शिवकॉलनीतील नायरा पेट्रोल पंपाजवळून जात होते. त्यावेळी तिला दुचाकीवरून आलेल्या पुरुष व महिलेने थांबविले. नंतर एक कॉल करायचा आहे, म्हणून तिच्या हातातील मोबाइल मागितला, नंतर त्या मोबाइलवर मैत्रिणीचा कॉल आला, म्हणून त्यांनी विद्यार्थिनी रेवती हिला मोबाइल दिला. पुन्हा तिच्याकडून मोबाइल मागून मग बोलत असल्याचे नाटक करून दुचाकीवरील पुरुष व महिला मोबाइल घेऊन पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थींनीने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी ५ वाजता अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल उषा सोनवणे करीत आहे.

Protected Content