यावल महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन         

 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजव्दारे संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकतेच विज्ञान मंडळाचे उद्घाटन यावल पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. एन. बढे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलानाने करण्यात आले.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे होत्या. कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. पी. कापडे, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. मयूर सोनवणे आदी उपस्थित होते.

प्रारंभी विज्ञान मंडळाचे चेअरमन प्रा. एम. डी. खैरनार यांनी प्रास्ताविकात विज्ञान मंडळाची भूमिका विशद केली.

उद्घाटक डॉ. बढे यांनी विज्ञानवादी विद्यार्थी हा चिकित्सक व तर्कज्ञानी असतो. जिद्द व चिकाटीने विद्यार्थ्याला यश सहज गाठता येते. ध्येयवादी विद्यार्थी कधीही अपयशी होत नाही असे उद्घाटन पर भाषणात नमूद केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी समस्या ही संशोधनाची जननी आहे. विज्ञानातील संशोधनामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती जोपासली जाते. विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती बाळगली पाहिजे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. डी. पवार यांनी केले तर आभार डॉ एच. जी. भंगाळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विज्ञान विभागातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे, प्रमोद कदम, संतोष ठाकूर, अनिल पाटील, अमृत पाटील, प्रमोद जोहरे, सचिन बारी, यतीन पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content