यावल महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने रांगोळी स्पर्धा

 

यावल, प्रतिनिधी । राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून २५ जानेवारी हा दिवस साजरा करण्यात येतो याचे औचित्य साधून कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रांगोळी स्पर्धाचे शनिवारी आयोजन करण्यात आले.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आयोजित रांगोळी स्पर्धेत महाविद्यालयाच्या मुलींनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते व महाविद्यालयाच्या प्राचार्या संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्यात. या स्पर्धत विजया पाटील, पुजा पाटील, वैष्णवी भंगाळे, चिमा पाडवी, कुंतीका कोळी, ललीता पाडवी, हेमा वसावे, खुशबु धांडे, राजश्री धनगर, प्रेरणा कोळी, दामीनी पाडवी, राणी भिलाला या विद्यार्थीनीनी आपला सहभाग नोंदवला. या राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधुन आयोजीत करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महा विद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा . अर्जुन पाटील , प्रा . संजय पाटील , प्रा . मुकेश येवले , अरूण सोनवणे , प्रा. विकास पाटील, प्रा. दिलीप मोरे, प्रा. सी. के. पाटील , प्रा. संजय कदम, प्रा. शेखर चव्हाण, प्रा. प्रविण पाटील, मिलींद बोरघडे, डी. पी. पाटील , ए. जी. पाटील, डी. डी. चौधरी, संतोष ठाकुर, ललीत भोईटे यांनी परिश्रम घेतले. तर या स्पर्धचे पंच म्हणुन अर्जुन पाटील, मुकेश येवले , संजय पाटील यांनी काम पाहीले. या स्पर्धत सहभागी विद्यार्थीनींना दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी फैजपुर येथील प्रांत कार्यालयात प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवुन सन्मान करण्यात येणार आहे.

Protected Content