जैन समाजातील गुणवंताचा रविवारी गौरव

 

जळगाव, प्रतिनिधी | येथील जैन युवा फौंडेशनतर्फे वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या सहकार्याने रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी गणपती नगरातील बाफना स्वाध्याय भवनात समाजातील गुणवंत विद्यार्थांचा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी १०: ३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. याप्रसंगी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दलीचंद जैन, उपाध्यक्ष नैनसुख लुंकड, सामाजिक कार्यकर्ते रतनलाल बाफना, कस्तुरचंद बाफना, ताराबाई डाकलिया, प्रकाशचंद समदडीया, विजया मल्हारा, रायसोनी इन्स्टिट्यूटच्या डॉ. प्रीती अग्रवाल, प्राचार्या देवानंदा साखला हे मान्यवर उपस्थित राहतील. सत्कारार्थी विद्यार्थ्यांसह पालकांनी, समाज बांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन अध्यक्ष दर्शन टाटीया, सचिव रितेश छोरीया यांनी केले आहे.

Protected Content