यावल महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज इतिहास संशोधन मंडळाचे उद्घाटन    

 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील ज.जि.म.वि.प्र.सह समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास संशोधन मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.संतोष जाधव उपस्थित होते. अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ संध्या सोनवणे यांनी भूषविले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. अनिल पाटील यांनी करून दिला. प्रमुख पाहुणे प्रा.संतोष जाधव यांनी संशोधनात इतिहासाचे महत्व विशद करून संशोधनआणि त्यासाठी लागणारी संसाधने या विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

संशोधनामध्ये अस्सल प्राथमिक दर्जाचे साधने व सत्यता या दोन गोष्टींना खूप महत्त्व आहे. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य. डॉ.संध्या सोनवणे यांनी संशोधनाचे महत्व, उद्दिष्टे, आणि फायदे सांगितले या मंडळाच्या पदसिद्ध अध्यक्ष पदी प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे मॅडम, सचिव डॉ. अनिल पाटील, तर सदस्य पदी उपप्राचार्य ए पी पाटील, उपप्राचार्य एम.डी.खैरनार, प्रा गणेश जाधव, प्रा संतोष जाधव, प्रा नंदकिशोर बोदडे, विद्यार्थी प्रतिनिधी समाधान कोळी, लीना पाटील, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी म्हणून प्रमोद भोईटे यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना पाटील हिने केले तर उपस्थितांचे आभार विद्यार्थ्यांनी तेजश्री कोलते हिने मानले. कार्यक्रमाला, ए.पी. पाटील, एम.डी. खैरनार, डॉ. सुधा खराटे, डॉ. एस.पी.कपडे, डॉ. अनिल पाटील, डॉ.पी. व्ही. पावरा, प्रा.गणेश जाधव, प्रा.संतोष जाधव, प्रा नरेंद्र पाटील प्रा. सुभाष कामडी, प्रा.भरती सोनवणे, प्रा. वैशाली कोष्टी, प्रमोद भोईटे, प्रा. मयूर सोनवणे, प्रा. विनोद अहिरे, प्रा.सी.टी. वसावे, प्रा. डॉ.आर. डी. पवार प्रा. मिलिंद मोरे, डी डी चौधरी,उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लीना पवार या विद्यार्थिनीने केले. इतिहास विभागाचे बहुसंख्व विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते. या संपुर्ण कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी इतिहास विभाग मंडळ व प्रमोद भोईटे यांनी सहकार्य केले.

Protected Content