यावल, प्रतिनिधी । येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यावल शहर शाखेच्या वतीने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या आजाराचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांना उपाययोजनांची जनजागृती करण्यात येऊन होमिओपॅथी औषधींचे वाटप करण्यात आले.
संपुर्ण देशात व महाराष्ट्र राज्यात विळखा घालणाऱ्या कोरोना संसर्गाच्या संकटासमयी अनेकांनी नागरीकांना विविध प्रकारच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यावल शहर अध्यक्ष चेतन अढळकर हे देखील आपले सहकारी गोविंदा सुतार, भुषण अढळकर, योगेश सपकाळे, रोहीत सुतार, पप्पू अढळकर, कैलास नन्नवरे हे नागरीकांच्या मदतीला धावुन आले आहेत. काल त्यांनी शहरातील पारधी वाडा , संभाजी पेठ , सुतार वाडा अशा विधिध प्रभागामध्ये फिरून कोरोना संसर्गासंदर्भात नागरीकांमध्ये जनजागृती करून कोरोना आजाराविषयी खबरदारी म्हणुन विविध उपाययोजनांवर मार्गदर्शन व सुचनाही दिल्यात. यावेळी त्यांनी २०० च्या कुटुंबांना आर्सेनिक एल्बम ३०या रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथी औषधीचे घोरघोरी जावुन वाटप केलीत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन करण्यात आलेल्या या सामाजीक कार्याचे अनेकांनी कौतुक केले.