यावल महसूल पथकाने वाळूने भरलेले बेवारस स्थितीतील ट्रॅक्टर केले जप्त

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील भालशिव शिवारात विनापरवाना वाळूची अवैध वाहतुक करणाऱ्या एका ट्रॅक्टरला महसुलच्या पथकाने जप्त केले असून या ट्रॅक्टरवरील चालक मात्र तिथ मिळुन आला नाही.

या संदर्भात महसुलच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील महसुलचे पथक हे वाळू माफीयाच्या मागावर असतांना आज मंगळवार दि. २७ एप्रिल रोजी सकाळी १० ते १०.३० वाजेच्या सुमारास भालशिव गावाच्या शिवारात यावल मार्गावर (एमएच १९ एएन ४१३४) क्रमांकाचे ट्रॅक्टर हे विनापरवाना गौण खनिजची वाहतुक करण्यासाठी वाळूने भरलेल्या बेवारस  स्थितीत यावल विभागाचे मंडळ अधिकारी शेखर तडवी , यावलचे तलाठी ईश्वर कोळी , परसाडे येथील तलाठी समिर तडवी , कोतवाल पंढरीनाथ अडकमोल व कोळवद तलाठी संदीप गोसावी व कोळवदचे कोतवाल सोनु सिंग यांचे पथक हे गस्तीवर असतांना मिळून आले आहे.  ट्रॅक्टरला कोतवाल पंढरीनाथ अडकमोल यांनी चालवुन पोलीस स्टेशनपर्यंत आणले. सदरचे हे ट्रॅक्टर वाहन शरद भागवत कोळी यांच्या मालकीचे असून त्यास यावल पोलीस स्टेशनमध्ये पुढील दंडात्मक कारवाईकरिता जमा करण्यात आले आहे.

Protected Content