यावल, प्रतिनिधी । येथील बाबुजीपुरा परिसरात नगर पालीकेचे विद्यमान एका नगरसेवकाच्या कुटुंबातील एक व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह आले असुन या परिसराला प्रातिबंधीत क्षेत्र म्हणुन सील करण्यात आले आहे.
प्रतिबंधीत क्षेत्रातील सुर्दशन चित्र मंदीर परिसरातील एक डॉक्टर हे देखील पॉझीटीव्ह आले असुन या आधी डॉक्टर यांच्या वीस वर्षीय मुलगा देखील पॉझीटीव्ह आला आहे. त्याला कोवीड१९ सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आहे. दरम्यान, आज मिळालेल्या नव्या वाढलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासनास अधिक सर्तकता बाळगावी लागणार आहे. आज तहसीलदार जितेन्द्र कुवर, नगर परिषदचे मख्याधिकारी बबन तडवी , पोलीस निरिक्षक अरूण धनवडे, आरोग्य यंत्रणा, नगर परिषदचे सर्व कर्मचारी यांनी तात्काळ या क्षेत्राचे निर्जंतुकरण फवारणी करण्यात आली आहे. दरम्यान, यावल तालुक्यातील दहिगाव एक, कोरपावली दोन, फैजपुर येथे दोन, आणि आज दोन कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण मिळुन आल्याने यावल शहरातील रुग्णसंख्या पाच झाली आहे. एकुण रुग्णसंख्या १o झाली असुन यातील २ बाधीतांचा या आधीच मृत्यु झाला आहे. या पार्श्वभुमीवर सुरक्षतेच्या दृष्टीकोणातुन शहरातील सुमारे शंभर लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.