यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्रांतीज्योती समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त यावल बस आगाराच्या वतीने विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.
यावल बस आगार प्रमुखांच्या दालनात दिनांक ३ जानेवारी रोजी थोर समाजसुधारक भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली , यावेळी यावल बस आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून पुजन करण्यात येवुन अभिवादन करण्यात आले, यावेळी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महान सेविका यांनी शैक्षणीक क्षेत्रात महिला शिक्षणा साठी केलेल्या क्रातीकारक कार्याचा उल्लेख केला.
या प्रसंगी आगाराचे सहाय्यक वाहतुक अधिक्षक जि.प. जंजाळ , विजय पाटील ( सहाय्यक कार्यालय अधिक्षक ) , बारसे (लेखाकार ), श्रीमती एस.एम.बडगुजर ( वरिष्ठ लिपीक ) , दिलीप ठाकरे ( एटीआय ) , श्रीमती आसवले ( लिपीक ) , श्रीमती अहावणे ( शिपाई ) दिपक गुरव ( शिपाई ) यांच्यासह आगारातील चालक ,वाहक व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते .