यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात यावल नगरपरिषेदच्या वतीने नुकतेच आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात २०० हून अधिक रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
यावल नगरपरिषदेच्या कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या आदेशान्वये मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. शहरातील खासगी व्यवसायीक डॉक्टर्स यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात येवून कोरोनाचा संभाव्य पादुर्भावाचा धोका टाळण्याकरीता नगरपरिषदेच्या वतीने नागरीकांची मोफत आरोग्य तपासणीचे तीन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. १७ जुलै शुक्रवार या दिवसी संपन्न झाले असता या आरोग्य तपासणी शिबीरास सुमारे २०० हून अधिक नागरीकांनी पहील्याच दिवशी आपली आरोग्य तपासणी करून घेतली होती. आज शिबीराच्या दुसऱ्या दिवसी १२३ नागरीकांनी शहरातील बोरावल गेट जिल्हा परिषद मराठी शाळा, बालसंस्कार विद्यामंदीर शाळा, आणि चोपडा रोडवर असलेल्या इंदीरा गांधी उर्दू गर्ल्स हायस्कुल या शिबीर केन्द्रावर जावुन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली आहे.