यावल तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांची आत्महत्या

32647912 this is a vector illustration of hanged man silhouette

 

यावल (प्रीतीनिधी ) वेगवेगळया घटनांमध्ये तालुक्यातील  दोन जणांनी आत्महत्या केल्या आहेत. याबाबत पोलीसात अक्समात मृत्युच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

 

याबाबत मिळालेली माहीती अशी की ,राजु भागवत बोदडे (वय४२ वर्ष , रा. वढोदे प्रगणे सावदा) हे काल दिनांक १६ फेब्रुवारी दुपार पासुन बेपत्ता होते. परंतू त्यांचा मृतदेह गावाजवळ असलेल्या ग्रामपंचायतीच्या कोरड्या विहीरीत आढळुन आला. बोदडे यांनी आत्महत्या का केली? हे मात्र समजु शकले नाही. दुसऱ्या घटनेत न्हावी तालुका यावल येथील नामदेव वाडयातील राहणारे वसंत पांडुरंग चोपडे (वय ५६ वर्ष) यांनी दिनांक १६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छतावरील पंख्याला बांधलेल्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. वसंत चोपडे यांचे दहा वर्षापुर्वी आपल्या पत्नीशी घटस्फोट झालेला आहे. तेव्हापासुन ते आपल्या घरात एकटेच राहात असल्याचे कळते. या दोघं मृतदेहांचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ .बी .बी .बारेला यांनी शवविच्छेदन करून त्यांचे प्रेत नातेवाईकांना सोपविले. याबाबत यावल आणि फैजपुर पोलीस स्थानकात अक्समात मृत्युच्या नोंदी करण्यात आल्या आहेत .

Protected Content