यावल, प्रतिनिधी | तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सामाजीक कार्यकर्ते तथा तत्कालीन नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवाराच्या माध्यमातुन मोफत ई -श्नम कार्ड अभियांन राबविण्यात येत आहे. या शिबिराला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून तत्कालीन नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवाराच्या माध्यमातुन मोफत ई -श्नम अभियांन राबविण्यात येत असून सदर शिबिर हे तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर कठोरा या गावात पहोचले आहे. ग्रामीण क्षेत्रातील विविध गावामध्ये असंघटीत असलेल्या सर्व क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा या दृष्टिकोणातुन सर्वसामान्य नागरीकांना आपल्या गावपातळीवर सुरू केलेल्या ई-श्नम कार्ड मोफत मिळावा याकरीता मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी महाअभियान सुरू केले आहेत. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत हजारो नागरिकांना फायदा झाला आहे. आज डोंगर कठोरा या गावात मोफत ई-श्रम कार्ड मोफत अभीयानाचे उद्धघाटन डॉ . कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच नवाज तडवी , उपसरपंच धनराज पाटील , माजी सरपंच व ग्राम पंचायत सदस्य मनोहर ईच्छाराम महाजन, लक्ष्मण भिरूड , जुम्मा तडवी ,माजी सरपंच कमलाकर राणे , माजी उपसरपंच यदुनाथ पाटील , माजी पंचायत समिती सदस्य रेखा तुकमान तडवी, लुकमान तडवी, भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी , उदय बाविस्कर, रघुनाथ पाटील , राहुल चव्हाण, पिंटु राणे , अनिल लोहार , प्रदीप पाटील , निखिल सोनवणे, नितीन भिरूड , हेमलता जावळे , उमेश कुरकुरे , किरण सरोदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दरम्यान महाअभियान यशस्वीतेसाठी सागर लोहार , मनोज बारी, हर्षवर्धन मोरे , जयवंत माळी , चेतन कापुरे, शुभम सोनवणे , धिरज भोळे, रितेष बारी, डॉ. कुंदन फेगडे आदींनी महत्वाचे परिश्रम घेतले आहे.