शेंदूर्णी येथे धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी व निवड झालेल्या सैनिकांचा सत्कार

शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथे आज दिनांक १८ ऑगस्ट रोजी  धनगर समाजातील इ.१० वी,१२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनीचा तसेच नव्यानेच निवड होऊन भरती झालेल्या सैनिकांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी समाजातील सर्व समाज बांधव उपस्थित होते.

धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी व निवड झालेल्या सैनिकांचा सत्कार करून त्यांना भावी आयुष्यासाठी समाजाच्या वतीने सदिच्छा व शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रावण सपकाळ, अमृत भवरे, आनंदा धनगर, राजेंद्र धनगर,श्रीराम काटे, दिलीप भवरे, आनंदा भिला धनगर, सचिन मनोरे, सागर मनोरे,अमृत भवरे, गजानन धनगर,शुभम सपकाळ आदींनी प्रयत्न केले. बळीराम धनगर, राहुल कचरे व सुनील भवरे सत्कारमूर्ती कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सपकाळ यांनी केले व सुरेश गावंडे यांनी प्रास्ताविक व आभार मानले.

Protected Content