यावल तालुक्यात भक्तीमय वातावरणात दुर्गामातेचे विसर्जन

यावल  प्रतिनिधी |  येथे शहरासह तालुक्यातील दुर्गा मातेचे विसर्जन कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर नियमाच्या काटेकोर पालन करीत भक्तीमय वातावरणात  शनिवार दि. १६ ऑक्टोबर   रोजी सांयकाळी  उशीरापर्यंत दुर्गा मंडळांच्या वतीने करण्यात आले व नवरात्र उत्सवाची सांगता झाली.

 

मागील वर्षाप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील नवरात्रीमध्ये शासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणुन नियमाच्या मर्यादा देण्यात आल्या होत्या. यावल शहरात दरवर्षी दुर्गा मातेचे विसर्जना प्रसंगी भाविकांची गर्दी होते, हे लक्षात घेऊन यावल पोलिस प्रशासन व नगरपालिका यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावल शहरात ४१ सार्वजनिक दुर्गाेत्सव मंडळे २ खाजगी मंडळ होती.  यावल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात एकुण १६२  सार्वजनिक दुर्गाेत्सव मंडळ व १० खासगी मंडळ असे यावलसह तालुक्यातील सर्व दुर्गा मातेचे विसर्जन या वर्षी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियमाचे पालन करत विसर्जन मिरवणूक विनावाद्य सायंकाळपर्यत शांततेत आटोपली.  शहरासह तालुक्यातील सार्वजनिक दुर्गात्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुका शांततेत होण्यासाठी पोलिस निरीक्षक सुधिर पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक अजमल पठाण , पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांनी पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आले होते. यावेळी पोलिस प्रशासनातर्फे यावल शहरासह तालुक्यासाठी  पोलिस कर्मचारी एकुण २४ , होमगार्ड ३८ असा पोलिस बंदोबस्त तालुक्यात विसर्जना करीता तैनात करण्यात आला होते.  यावेळी यावल शहरात ठिकठिकाणी सीसीटिव्ही लावण्यात आले होते.

Protected Content