यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानास विविध मतदान केन्द्रावर आज सकाळपासुन सुरुवात झाली असुन दुपारच्या २वाजेपर्यंत एकुण ४८. २८ टक्के मतदान झाले आहे.
यावल तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज सकाळच्या ७.३० वाजेपासुन १७९ मतदान केन्द्रावर १७९ई्व्हीएम यंत्रणेवर दुपारच्या २ वाजेपर्यंतच्या मिळालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार ४५८४६ मतदारांनी आपल्या मतदानाचा ह्क्क बजावला असून ४८.२८ टक्के मतदान झाले आहे. या ४५ हजार ८४६ मतदारांमध्ये २५ हजार २८३ पुरुष व २२ हजार ५९५ स्त्रीयांनी मतदान केले आहे. दरम्यान अनेक केन्द्रांवर मतदारांची गर्दी वाढल्याचे दिसुन येत आहे. सायंकाळपर्यंत मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता असुन यंदाचे मतदानाची टक्केवारी ही मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिक असणार आहे. संपुर्ण निवडणुक प्रक्रीया नियमाच्या चाकोरीत व शांततेपार पडावी यासाठी निवडणुक निरिक्षक व्ही. व्ही. बादल यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका निवडणुक निर्णय अधिकारी महेश पवार यांनी विविध मतदान केन्द्रावर जावुन पाहणी केली.