यावल तालुक्यात गुटख्याची सरार्स विक्री : संबंधितांवर कारवाईची मागणी

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात मानवी आरोग्यास व जिवनास अत्यंत धोकादायक असा गुटखा पानमसाल्याची सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे विक्री केली जात असून अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस विभागाद्वारे संबधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

 

तालुक्यात विविध ठिकाणी सहज मिळणाऱ्या गुटख्याच्या सेवनामुळे अनेक तरूणांना कर्करोगासारखे गंभीर आजार होवुन त्यांचा दुदैवी मृत्यु होत असल्याचे ह्वदयविदारक चित्र पहावयास मिळत आहे . यावल तालुक्यातील पुर्व व पश्चिम आणि उत्तरेकडील क्षेत्र या भागाला लागुन मध्य प्रदेश व गुजरात राज्यांचे सिमा आहेत. याच मार्गावरून अत्यंत छुप्या पद्धतीने तालुक्यात महीन्याला सुमारे चाळीस ते पन्नास लाख रुपयांच्या गुटख्याची आयात करण्यात येते व नंतर हा गुटखा इतर वाहनाव्दारे तालुक्यातील विविध भागात वितरीत करण्यात येतो. घुटका आता शहरातील पानटपरीधारक व किराणा व्यवसायीकांना विक्रीसाठी देण्यात येत असतो. हा गुटखा बिनधास्तपणे विकण्यात येत असल्याने अल्पवयीन शाळकरी मुल ,मुली व महीला आणि तरूण या गुटख्याच्या आहारी जावुन आपले जिवन उद्धवस्थ करीत आहे. अन्न व भेसळ प्रतिबंधक खात्याची या गुटखा विक्रेत्यांविरूद्ध मोठी कारवाई यावल शहरात होतांना आजपर्यंत दिसून येत नसल्याने या गुटखा विक्री अप्रत्यक्ष पाठींबा आहे का ? असे सर्वसामान्य नागरीकांमध्ये बोलले जात, आहे. यावल तालुक्यास प्रथमच लाभलेले आयपीएस अधिकारी आतिश कांबळे यांनी या विषयाकडे लक्ष दिल्यास तालुक्यातुन गुटखा विक्रीचा गौरखधंदा हाद्दपार होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य पालक व नागरीक व्यक्त करीत आहे.

Protected Content