यावल, प्रातिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील अंगणवाडीच्या कार्यलयात आज सकाळी पल्स पोलिओ लसीकरण मोहीमच्या शुभारंभ यावल पंचायत समीतीचे उपसभापती दिपक नामदेव पाटील यांच्या हस्ते करण्यांत आला.
यावल पंचायत समीतीचे उपसभापती दिपक नामदेव पाटील यांनी धनुष राहुल पाटील या बालकांला पल्स पोलिओची लस पाजून या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस प्रारंभ केला. याप्रसंगी आशा स्वयंमसेविका रंजना कोळी, पुनम पाटील, आलकाबाई ईंधाटे, ज्योती ईंधाटे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यं मंगलसिंग पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश पाटील, पत्रकार गोकुळ कोळी, राहुल पाटील, बुद्ध भुषण इंधाटे यांच्यासह ग्रामथ उपस्थीत होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली साकळी प्राथमिक आरोग्य केन्दाचे डॉ. सागर पाटील, आरोग्यसेवक राजेश्वर निकुंभ, संजय पारधी, आरोग्यसेविका सविता कोळी, वाहन चालक शेख शोएब यांनी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी कामकाज पहिले.