यावल तालुक्यातील निष्ठा प्रशिक्षणाची यशस्वी सांगता

WhatsApp Image 2020 01 24 at 10.39.19 PM

यावल, प्रतिनिधी | येथील नगर परिषद द्वारे संचलीत साने गुरुजी उच्च माध्यमिक विद्यालय यावल येथे तालुकास्तरीय शेवटच्या बॅचच्या निष्ठा प्रशिक्षणाच्या समारोप करण्यात आला. याप्रसंगी डॉ मंजुषा क्षिरसागर आणि प्रार्याय डायट यांनी प्रशिक्षणार्थीशी संवाद साधला.

निष्ठा प्रशिक्षण संदर्भात शिक्षक मुख्याध्यापक यांच्या क्षमता बांधणी संदर्भात एकात्मिक दृष्टिकोन विकसित होवून सदर प्रशिक्षणातून अध्ययन अध्यापन शास्त्र नेतृत्व विकास आरोग्य शिक्षण, कला शिक्षण या सर्व घटकांचा विकास होण्यास व वर्गातील आंतरक्रिया अधिक समृद्ध होऊन गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी निष्ठा प्रशिक्षणाच्या माध्यमातून शक्य होईल अशा भावना डॉ. मंजुषा क्षीरसागर यांनी व्यक्त केल्या. त्यांनी तज्ञ मार्गदर्शक एस.आर.पी. तथा केंद्रप्रमुख विजय ठाकूर तसेच के.आर.पी. निर्मल चतुर, वाहिद शहा, किशोर चौधरी, संदीप मांडवक,र राहुल पाटील यांनी सलग गेल्या महिनाभरापासून यावल तालुक्यातील संपूर्ण मुख्याध्यापक शिक्षक पर्यवेक्षीय यंत्रणा अशा सर्व चारही बॅच मधील ५८० शिक्षकांना अतिशय उत्कृष्टरित्या प्रशिक्षण दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन प्राचार्य डॉ. क्षीरसागर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी ई. आर. शेख गटशिक्षणाधिकारी प. स. यावल तालुका समन्वयक नईम शेख, सहसमन्वयक सातघरे मॅडम तसेच केंद्रप्रमुख प्रदीप सोनवणे, प्रमोद सोनार यांनी मोलाची जबाबदारी पार पाडली. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील केंद्रप्रमुख एन. डी. तडवी, गुलाम दस्तगीर खान, सुरेश तायडे, प्रमोद कोळी, सुलोचना धांडे, रजनी रोझतकर तसेच बीआरसी साधन व्यक्ती नितीन पाटील. झाडे सर, वरटकर सर, शेवाळे सर यांनी प्रयत्न केलेत. र प्रशिक्षणासाठी आवश्यक भौतिक सुविधा वर्गखोल्या प्रोजेक्टर संगणक इत्यादी सुविधाबाबत साने गुरुजी विद्यालयाचे प्राचार्य वाघ यांनी तसेच शिपाई मुकेश यांची मदत झाली.

Protected Content