यावल कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

यावल, प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्यादित जळगाव संचलित कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कनिष्ठ विभागातर्फे थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपप्राचार्य प्रा .एम.डी. खैरनार प्रमुख वक्ते होते तरअध्यक्षस्थान डाॅ. सुधा खराटे यांनी भूषविले.

 

कार्यक्रमाच्या आरंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. एम .डी .खैरनार यांनी देशातील पहील्या महिला शिक्षीका सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या उल्लेखनिय सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती ही आपल्या विचारातुन व्यक्त करतांना सांगीतले की, महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक क्रांतीमध्ये सावित्रीबाई फुले यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांनी लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षात रुपांतर झालेले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. सुधा खराटे यांनी प्रतिपादन केले की, सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण, सेवा व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. त्यांच्यात तीव्र संवेदनशीलता व सेवाभाव होता. आयुष्याच्या अंतापर्यंत त्यांनी समाजाची निस्वार्थ सेवा केली. डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपप्राचार्य प्रा. संजय पाटील यांनी केले तर आभार प्रा. सी.के.पाटील यांनी मानले.कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, प्रा. शेखर चव्हाण, प्रा. मनोज पाटील, प्रा. अरुण सोनवणे, प्रा. दिलीप मोरे व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Protected Content